राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 'ग्रामगीता' हा एक नित्यनूतन स्फूर्तीचा झरा आहे. देहत्वाकडून देवत्व कडे नेणाऱ्या ज्या मानवी मूलभूत प्रेरणा व त्यांचे समाज भिमुख उन्नयन राष्ट्रसंत श्री.तुक डोजी महाराजांनी 'ग्राम गीतेतून' केलेले आहे. आशिस्त, असंघटित, अशिक्षित अश्या समाजाला मार्गदर्शन करणारी 'ग्रामगीता ' जणू दीपस्तंभ होय..
हा दीपस्तंभ पेटवत ठेवण्याचे काम गुरुकुंज मोझरी यांच्या वतीने ग्रामगीत जीवन विकास परीक्षेच्या माध्यमातून दर वर्षी घेणायत येते. राष्ट्रसंतांचे विचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे व त्यांच्या विचारसरणीत बदल व्हावा या उदात्त हेतुने सदर परीक्षेचे आयोजन महाविद्यालयात 2015 पासून आजपर्यंत अविरत सुरू आहे. महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा या परीक्षेचा लाभ घेऊन राष्ट्रसंताची माहिती जाणून घेतली. प्राविण, ग्रामनाथ, ग्रामगीता रत्न, ग्ग्रामगीताचार्या अशा विविध स्तरातून या परीक्षेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येते. व या पुढेही करण्यात येईल.
सदर परीक्षेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी प्राचार्याच्या वतीने डॉ. प्रमोद एच. पौनिकर (पर्यवेक्षक) यांच्या कडे सोपविण्यात आलेली आहे. विविध स्तरातील परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते व प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येते..